सोशल मीडियावर 'हिंदू जन नायक'च्या पोस्ट

 आज होणाऱ्या मोर्चा साठी मनसे कार्यकर्त्यानी टी शर्ट बनवले आहेत.

Updated: Feb 9, 2020, 07:56 AM IST
सोशल मीडियावर 'हिंदू जन नायक'च्या पोस्ट title=

मुंबई : हिंदू जन नायक राज ठाकरे अशा पोस्ट सध्या सोशल मिडीयावर पहायला मिळू लागल्यात. राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्याला हिंदू हृदय सम्राट म्हणून नये असं सांगितल्यानंतर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदू जन नायक अशा पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यात. आज होणाऱ्या मोर्चा साठी मनसे कार्यकर्त्यानी टी शर्ट बनवले आहेत त्यावरही हिंदू जन नायक म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख केलेला पाहायला मिळत आहे.

मुंबईतील आझाद मैदान इथे आज मनसेचा मोर्चा निघणार आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातून जवळपास १५ ते २० हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मोर्चात सहभागासाठी विभागनिहाय बैठका घेण्यात आल्यात.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत मनसे भव्य मोर्चा काढत आहे. हा मोर्चा गिरगावपासून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आझाद मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत.

या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्ते मरिन लाइन्स इथल्या हिंदू जिमखाना इथून आझाद मैदानात जाणार आहे. त्यामुळे पदयात्रा, सभा यावर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली आहे.