मध्य रेल्वेकडून पावसाळ्या पूर्वीची कामं पूर्ण

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा 

Updated: Jun 9, 2020, 12:32 PM IST
 मध्य रेल्वेकडून पावसाळ्या पूर्वीची कामं पूर्ण title=

मुंबई :  येणा-या पावसाळ्यात सुरळीत व निर्बाध सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेने पावसाळ्याची तयारी केली आहे. जसे की गटारे साफ करणे, नाले साफ करणे, झाडे सुशोभित करणे, दरडींचे स्कॅनिंग करणे, पाणी  तुंबणाऱ्या असुरक्षित ठिकाणी उच्च व्होल्टेज पंपांची व्यवस्था, मल्टी-सेक्शन डिजिटल काउंटर इ.  तरतूद करण्यात आली आहे.  एप्रिल आणि मे महिन्यात लॉकडाऊनचा फायदा घेत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आपल्या उपनगरी नेटवर्कवर तसेच घाटांमध्ये मान्सून खबरदारीच्या उपाययोजना केल्या.  अखंडित सेवा सुनिश्चित करण्याच्या उपाययोजनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 मध्य रेल्वेवरील मुंबई उपनगरी नेटवर्कवर मागील वर्षीच्या तुलनेत १७ असुरक्षित ठिकाणी अधिक उच्च व्होल्टेज पंपांची तरतूद 

 मध्य रेल्वेने मुसळधार पावसात पाणी तुंबणारे १७ असुरक्षित ठिकाणे शोधून काढली आहेत आणि त्या ठिकाणी १४० हून अधिक पंपांची (रेल्वे व बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे) तरतूद केली आहे.  यावर्षी पूर टाळण्यासाठी पूरग्रस्त ठिकाणी जास्त संख्येने व अधिक क्षमतेचे पंप वाढविण्यात आले.  मुख्य मार्गावर मस्जीद, माझगाव यार्ड, भायखळा, करी रोड, शीव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नाणीपाडा, ठाणे, डोंबिवली व हार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, कोपरखैरणे आणि  तसेच मुख्य मार्गावरील दक्षिण-पूर्व दिशेकडील किमी  ६५ /७-८ व किमी ७५/१-२ येथील भुयारी मार्ग (सबवे) अशी काही ठिकाणे चिन्हांकीत करण्यात आली  आहेत.  

 नाल्यांची साफसफाई करणे 

 मध्य रेल्वेने आपल्या उपनगरी भागात ११३ कि.मी. नाल्यांची साफसफाई केली आहे.

 कल्वर्टसची साफसफाई करणे 

  मध्य रेल्वेने आपल्या  उपनगरी भागातील मुख्य मार्गावरील ५५ आणि हार्बर मार्गावरील २२ असे एकंदर ७७ कल्वर्टसची साफसफाई  केली आहे.

 महत्वाच्या नाल्यांची साफसफाई  

 मध्य रेल्वेने घाटकोपर - कांजूरमार्ग, घाटकोपर - विक्रोळी दरम्यानचे नाले आणि कुर्ला टर्मिनल नाला हे अतिशय महत्वाचे नाले साफ केले आहेत.

 घाट विभाग - दरडींचे स्कॅनिंग आणि सैल झालेल्या दरडी कोसळविणे 

 मध्य रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागातील उदा. कसारा ते इगतपुरी दरम्यान, १८ बोगद्याची तपासणी करण्यात आली, दरडींचे स्कॅनिंग करण्यात आले, ४० दरड  शोधून कोसळविण्यात आले आहेत.  याशिवाय, १४ ठिकाणी ५० पाहरेकरी तैनात केले जात आहेत आणि २४×७ सातत्याने  देखरेख ठेवण्यासाठी आणि वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून ७ बीट्सवर ७५ गस्तीदार तैनात केले जात आहेत.

 मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागातील उदा. कर्जत ते लोणावळा दरम्यान, ५२ बोगद्यांची तपासणी करण्यात आली, बोल्डर स्कॅनिंग करण्यात आले.  शिवाय ७४ पाहरेकरी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तसेच  २४x७ सातत्याने पहारा ठेवण्यासाठी आणि वाहतुकीस कोणताही अडथळा येवू नये म्हणून ५४ गस्तीदार (पेट्रोलमन) तैनात केले  जात आहेत.

 आणखी एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे दक्षिण पूर्व घाट विभागात बोगदा क्र.४८ व ३१ यांच्या बोगदा पोर्टल विस्ताराचे बांधकाम झाल्यामुळे रेल्वे मार्गावर दरड  कोसळण्यास प्रतिबंध होईल.

 जलमार्गाची क्षमता वाढविणे 

 लॉकडाऊनचा फायदा घेत कुर्ला ते विद्याविहार स्थानकांदरम्यान कल्वर्टसची क्षमता वाढवण्यासाठी  ७०  मीटर्सच्या लांबीची व १.८ मीटर व्यासाची दोन पाईप्स सूक्ष्म बोगद्याद्वारे पाईप पुशिंग करून टाकली गेली आहेत.

 वडाळा ते रावळी विभागा दरम्यान आरसीसी बॉक्स टाकल्यामुळे विद्यमान पुलाच्या   जलवाहिनीची क्षमता वाढली आहे.  त्याचप्रमाणे टिळक नगर पुलावर जलमार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले असून टिळक नगर स्थानकात आरसीसी बॉक्स टाकल्यामुळे ४.९ मीटर जास्त खुला तयार करण्यात आल्याने जलमार्गाची क्षमता वाढविण्यात आली आहे.  तसेच पनवेल ते कर्जत दरम्यान विद्यमान पुलाला लागून आरसीसी बॉक्स टाकून ब्रिज जलमार्गाच्या वाढीमुळे जलवाहिनीची क्षमता वाढली आहे. जल प्रवाह वाढविण्यासाठी बदलापूर ते वांगणी दरम्यान १.८ मीटर व्यासाचा पाईप टाकला गेला आहे.  लॉकडाऊनचा फायदा घेत मध्य रेल्वेने महत्त्वाच्या वालधुनी पुलाच्या स्टील गर्डरच्या जागी पीएसबी स्लॅबने बदलण्यात आला.

 नवीन उपक्रम 

 • एमएसएफ जवान + रॅपीड ॲक्शन फोर्स म्हणून आरपीएफ कर्मचारी.
• एनडीआरएफच्या सहकार्याने एक आरपीएफ फ्लड रेस्क्यू टीम तयार केली जात आहे. 
• गर्दी नियंत्रणासाठी  चिंताजनक पादचारी पूल शोधून तेथे कर्मचारी तैनात केले आहेत.
• प्लॅटफॉर्म छताची पुनर्बांधणी (९ स्थानकावर ) - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील उपनगरीय प्लॅटफॉर्म, टिळकनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द, शीव, गुरु तेग बहादुर नगर, मस्जीद, सँडहर्स्ट रोड, रे रोड.
 प्लॅटफॉर्मच्या पृष्ठभागाची सुधारणा (१० स्थानकावर): छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, खडवली, आसनगाव, इगतपुरी, पळसधरी, माथेरान, बदलापूर, चुनाभट्टी. 
• कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्मचा विस्तार (५ स्थानकावर) - पनवेल, सँडहर्स्ट रोड, रे रोड, कॉटन ग्रीन, दिवा.
•  गर्दी व्यवस्थापनावर कार्यशाळा देखील आयोजित केली.
• घाट विभागात असुरक्षित असलेल्या ठिकाणी सीसीटीव्हीसह मोठाले दिवे. 
• बोगदा आणि घाटात सुधारित संप्रेषण प्रणाली.  (लीकी केबल आणि व्हीएचएफ)
• असुरक्षित ठिकाणी अतिरिक्त स्टॅटीक वॉचमन

 २४×७ नियंत्रण कक्ष 

चोवीस तास कार्यरत असलेले मध्य रेल्वेचे नियंत्रण कक्ष कार्यालय, हवामानशास्त्र विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच सतत देखरेखीसाठी आणि सतत अद्यतनासाठी पूरग्रस्त भागात नियुक्त केलेल्या कर्मचारी यांच्याशी सतत संपर्क ठेवेल.