नव्या वर्षात सामान्यांना बसणार धक्का, खासगी रुग्णालयांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

महागाईमुळे आधीच होरपळलेल्या सामान्यांना आता खासगी रुग्णालयांचा धक्का

Updated: Dec 15, 2021, 07:49 PM IST
नव्या वर्षात सामान्यांना बसणार धक्का, खासगी रुग्णालयांनी घेतला 'हा' मोठा निर्णय title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच आता नव्या वर्षात जनतेला आणखी एक धक्का बसणार आहे. कोरोना काळात खासगी रुग्णालयांनी (Private Hospital) अव्वाच्या सव्वा बिलं आकारात मोठा नफा कमावला. आता महागाईच्या नावाखाली रुग्णांच्या उपचार आणि हेल्थ पॅकेजच्या (Health Insurance) किंमती वाढवण्याचा निर्णय खासगी रुग्णालयात घेणार आहेत.

खासगी रुग्णालयांच्या या निर्णयामुळे आरोग्य विमाही महागणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य माणसाचं बजेट आणखी कोलमडणार आहे.

10 टक्क्यांपर्यंत होऊ शकते वाढ
खासगी रुग्णालयांकडून रुग्णांच्या उपचारांचा खर्च आणि हेल्थ पॅकेजमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. त्यामुळे विमा कंपन्यांनाही खासगी रुग्णालयांसोबत केलेल्या करारात अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याचा परिणाम म्हणजे विमा कंपन्या आपल्या मेडिकल इंन्शुरन्सच्या किंमतीत वाढ करु शकतात. दरमहा कापल्या जाणाऱ्या ग्रुप हेल्थ प्रीमियमचा दर वाढणार आहे.

वैयक्तिक हेल्थ पॉलिसीच्या प्रीमियममध्ये वाढ करण्यासाठी IRDAI ची मंजुरी आवश्यक असते. पण कोरोनाच्या क्लेम केसेस वाढल्याच्या नावाखाली आरोग्य कंपन्या वैयक्तिक हेल्थ पॉलिसीमध्ये प्रीमियम वाढवण्याची मागणी करत आहेत. जर IRDAI ने ही मागणी मान्य केली, तर लोकांसाठी वैयक्तिक हेल्थ पॉलिसी घेणं अधिक महाग होईल.