वाशिंदमधील रेलरोको मागे, आंदोलक प्रवाशांना हटवलं

गेल्या तीन दिवसांपासून टिटवाळा ते आसनगाव लोकलसेवा बंद आहे. या विरोधात संतापलेल्या प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलं. आता वाशिंद रेल्वे स्थानकावरील रेलरोको मागे घेण्यात आला आहे.

Updated: Sep 1, 2017, 11:41 AM IST
वाशिंदमधील रेलरोको मागे, आंदोलक प्रवाशांना हटवलं  title=
संग्रहित छायाचित्र

ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून टिटवाळा ते आसनगाव लोकलसेवा बंद आहे. या विरोधात संतापलेल्या प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलं. आता वाशिंद रेल्वे स्थानकावरील रेलरोको मागे घेण्यात आला आहे.

रेल्वे पोलिसांनी आंदोलक प्रवाशांना रुळावरुन बाजूला हटवलं. आंदोलकांनी अडवलेली रेल्वे सोडण्यात आली. 

मागील तीन दिवसांपासून टिटवाळा ते आसनगाव मार्गावरील लोकलसेवा बंद आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. अखेर आज संताप अनावर झाल्याने प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकावर सकाळी दादरहून अमृतसरला जाणारी एक्स्प्रेस रोखली. मात्र रेल्वे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन आंदोलक प्रवाशांना रुळावरुन हटवून अडवलेली रेल्वे रवाना केली. त्यानंतर प्रवाशांनी रेलरोको मागे घेतला.

दरम्यान, दुरांतो अपघातामुळे बंद पडलेला आसनगाव-कल्याण अप रेल्वेमार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंदच आहे. या रेल्वे मार्गाची दुरुस्ती अजूनही सुरुच आहे. त्यामुळेही प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.