रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, प्रवाशांनो बाहेर पडण्याआधी इकडे लक्ष द्या...

मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकातही विशेष ट्राफिक आणि पॉवर मेगाब्लॉग 

Updated: Apr 20, 2019, 10:48 AM IST
रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक, प्रवाशांनो बाहेर पडण्याआधी इकडे लक्ष द्या...  title=

मुंबई : रविवारी २१ एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळाच्या देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी २१ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मांटुगा ते मुंलुड डाऊन धीम्या, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप- डाऊन तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकात घेण्यात आलेल्या विशेष ट्राफिक आणि पॉवर मेगाब्लॉगमुळेही काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर...

मुख्य मार्गावर मांटुगा ते मुंलुड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. माटुंगाहून सुटणाऱ्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक सकाळी १०.५७ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यत डाउन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. सीएसएमटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धीम्या मार्गांवरील सर्व लोकल गाड्या सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळापेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर...

सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०  वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९.५६ ते दुपारी ४.२३ वाजेपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगाव दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे... तर सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी सकाळी ९.५३ ते दुपारी २.४४ अप-डाऊन वाहतूक बंद राहणार आहे. या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक ८ वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर...

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील वाहतुक अप-डाउन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. दरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत

इगतपुरीतही रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकात घेण्यात आलेल्या विशेष ट्राफिक आणि पॉवर मेगाब्लॉगमुळे मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणारी मनमाड- लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस, मनमाड - मुंबई राज्यराणी एक्सप्रेससह भुसावळ - पुणे,  हुतात्मा एक्स्प्रेस,  भुसावळ -मुंबई पॅसेंजर या महत्वपूर्ण रेल्वे प्रवाशी गाड्या उद्या अर्थात रविवारी रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या मार्गात बद्ल करण्यात आला. बऱ्याच प्रवासी गाड्या कसारा रेल्वे स्थानकात २-३ तास थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. उन्हाळी सुट्टी, दाट लग्नतिथी यामुळे रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढत असतांनाच मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा होणार आहे.