मुंबई : प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळासमोर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मनसेवर तोंडसुख घेतलंय.
मनसे तो फस गया, क्योंकी डेढ करोड लोगों ने अप्लाय किया है. मनसे का विरोध खाडी मे गया अशा आशयाची गोयल यांची वाक्यं मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालीयेत. हा प्रकार लक्षात येताच चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला रेल्वेमंत्र्यांनी बैठकीतून बाहेर हकललंय.
तीन ते चारवर्ष प्रशिक्षण घेतलेल्या हजारो प्रशिक्षणार्थींना कायम नोकरीत घ्यावं, या मागणीसाठी मंगळवारी देशभरातले विद्यार्थी माटुंगा आणि दादर स्थानकादरम्यान रुळावर उतरलेत. मागील तीन तासांपासून लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पण, अजूनही प्रशासन झोपलेलंच असल्याचं दिसतंय. दोन्ही बाजूची वाहतूक बंद असल्यानं सकाळी सकाळी कामावर निघालेल्या लाखो मुंबईकरांची पुरेवाट लागलीय.
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि त्यानंतर आंदोलकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.