कल्याण:चालू रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न, पोलिसांमुळे वाचला पिता-पुत्राचा जीव

कल्याण स्थानकातील ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Updated: Jul 28, 2020, 07:27 PM IST
कल्याण:चालू रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न, पोलिसांमुळे वाचला पिता-पुत्राचा जीव title=

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील आज मोठी घटना होता होता टळली. चुकीची लांब पल्ल्याची गाडी पकडली आहे हे लक्षात आल्या नंतर एक्सप्रेस सुरू झाल्या नंतर खाली उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला स्थानकावरील रेल्वे पोलिसांनी वाचवलं.

पिता पुत्रांनी उलट दिशेने उतरण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते रेल्वेच्या खाली येता-येता वाचले. पण कल्याण रेल्वे स्थानकात तैनात असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत या दोघांना वाचवले.

ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.