मुंबई : मुंबईत डेंग्यू मलेरियासह पावसाळी आजारांचं संकट ओढवलं आहे. जुलैच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढल्यानं महापालिका प्रशासन सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तिस-या लाटेच्या सावटात असतानाच मुंबईत पावसाळी आजार बळावलेत. ऑगस्टच्या दुस-या आठवड्यातच मुंबईत मलेरिया डेंग्यु गॅस्ट्रो कावीळ लेप्टो आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. पावसामुळे पाणी साचून डास वाढणार नाहीत याची काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. तर ताप, उलट्या, जुलाबासारखी लक्षणं आढळताच डॉक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहनही पालिकेनं केल आहे.
मुंबईकरांनो, सावधान अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण डेंग्यू, मलेरिया, लेप्टो, गॅस्ट्रोचा मुंबईत धोका वाढला आहे. कोरोना पाठोपाठ रुग्णसंख्येत महिनाभरात दुपटीने वाढ झाली आहे. नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट असतानाच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईचं टेन्शन पुन्हा एकदा वाढलं आहे. सुदैवाने या आजारांमध्ये पावसाळ्यात एकही बळी गेला नसला तरी रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज निर्माण होत आहे. पावसाळी आजार वाढल्यामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहन पालिकेने केल आहे.