९ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयातून बाहेर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत.

Updated: Aug 22, 2019, 08:33 PM IST
९ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे ईडी कार्यालयातून बाहेर title=

मुंबई : कोहिनूर खरेदी कथीत गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरे गेलले राज ठाकरे नुकतेच ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत. सलग आठ तास ईडीमार्फत ही चौकशी सुरु होती. यातील बहुतेक प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे यांनी दिली. आणि काही प्रश्नांची उत्तरे देताना मला आता आठवत नाही असेही उत्तर दिल्याची माहीती समोर येत आहे. जर का गरज पडली तर राज ठाकरे यांनी ईडीमार्फत पुन्हा बोलावले जाऊ शकते अशी माहीती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आठ दिवसांमध्ये त्यांना पुन्हा बोलावले जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हाही सहा ते आठ तास लागण्याची शक्यता आहे. 

उन्मेश जोशी आणि राजन शिरोडकर यांना विचारलेल्या प्रश्नांची उलटतपासणीही राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. उन्मेश जोशी आणि राजन शिरोडकर या दोघांनी ईडी चौकशी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता.