मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे आपल्या मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. जोपर्यंत कोरोनावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगण्याची तयारी मनाने करायला हवी. सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसत असल्याचं देखील त्यांनी यावेळी पत्रात म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी या पत्रात मनसे कार्यकर्त्यांच कौतुक केलं आहे. मनसे कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धावून जात असल्याचा आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. तसेच आपल्यासारखे सैनिक आपल्याला लाभले म्हणून आपण भाग्यवान असल्याचं देखील म्हटलं आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पत्र..
कोरोनाच्या काळात मनसे कार्यकर्ते करत असलेल्या कामाचे कौतुक @mnsadhikrut @RajThackeray @SandeepDadarMNS pic.twitter.com/lyIL2YWGMp— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 12, 2020
१४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. म्हणून कुणीही शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या... ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा असल्याचं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या पत्राने मनसे कार्यकर्त्यांना खूप मोठं बळ मिळालं आहे. संदीप देशपांडे यांनी साहेब तुमची शाबासकी हत्तीचं बळ देते असं म्हटलं आहे.
साहेब तुमची शाबासकी आम्हाला हत्तीचं बळ देते pic.twitter.com/JKnLxP2wkk
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 12, 2020
राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मनसे कार्यकर्त्यांच कौतुक केल्यामुळे त्यांचा हुरूप वाढला आहे.