दूध दर प्रश्नावर राजू शेट्टींचा सरकारला इशारा, आम्ही कायदा हातात घेणार !

दूध दराच्या प्रश्नावरुन खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत.  

Updated: Jul 7, 2018, 06:28 PM IST
दूध दर प्रश्नावर राजू शेट्टींचा सरकारला इशारा,  आम्ही कायदा हातात घेणार ! title=

मुंबई : दूध दराच्या प्रश्नावरुन खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत. आम्ही कायदा हातात घेणार आहोत, सरकारने काय करायचे आहे ते करावे, असा इशारा शेट्टींनी सरकारला दिलाय. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने लक्ष न दिल्याने दुधाचे दर पडत गेल्याचा आरोप शेट्टींनी केलाय.

दूध भुकटीचा बफर स्टॉक करावा, कर्नाटक-केरळ-गोव्याप्रमाणे दूधाला राज्य सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी शेट्टींनी केलीय. सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास १६ जुलैपासून एक थेंब दूध विकले जाणार नाही असा इशाराही शेट्टींनी दिलाय. उपद्रवमूल्य दाखवल्याशिवाय सरकारला जाग येत नाही असं सांगत त्यांनी यावेळी मुंबईकरांना होणाऱ्या संभाव्य त्रासाबद्दल माफीही मागितलीय. तसंच जे जबरदस्तीने दूध आणतील त्यांना शेतकरी प्रसाद देतील असाही इशारा शेट्टींनी दिलाय.