माहीममध्ये पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या

 मुलीचे लैंगिक शोषण करुन हत्या केल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. 

Updated: Feb 8, 2019, 03:51 PM IST
माहीममध्ये पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या  title=

मुंबई : मुंबईच्या माहीममध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. माहीमच्या एल.जे रोडवरील झोपडीतून पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. ती मुलगी आपल्या परिवारासोबत त्या झोपडीत राहत होती. 3 अज्ञात इसमांनी तिला झोपडीतून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला होता. आता माहीममध्ये त्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचे लैंगिक शोषण करुन हत्या केल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत असून लवकरात लवकर आरोपीला बेड्या ठोकू असे पोलीसांतर्फे सांगण्यात येत आहे. 

Image result for raped zee news

पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत माहीम येथील झोपडीत राहत होती. तिचे आई-बाब मोल-मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. मुलीच्या वडीलांना सकाळी उठल्यावर ती दिसली नाही. त्यांनी आजुबाजूला चौकशी केली. पण ती कुठेट सापडली नाही. त्यानंतर घाबरलेल्या वडीलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. 10 वाजण्याच्या सुमारास त्याच रोडवरील एका सामसूम जागी मुलीचा मृतदेह सापडला. याठिकाणी दारुडे, गर्दुल्यांचा येजा सुरु असते.  पोस्टमार्टन रिपोर्टमध्ये मुलीवर बलात्कार झालेल्या घटनेस दुजोरा देण्यात आला आहे. 

आम्ही अज्ञात आरोपीविरोधात दुष्कृत्य आणि हत्येची कलम आणि गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलीस कमिशनर (झोन 5) विक्रम देशमाने यांनी माध्यमांना सांगितले. या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. या माहितीसाठी वेगवेगळ्या टीम केल्या असून त्या वेगाने तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता.  आंध्र प्रदेशमध्ये एका 42 वर्षाच्या शाळेच्या शिक्षकाला आपल्याच शाळेतील दुसरीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती.कृष्णा जिल्ह्यातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत ही घटना घडली होती. चिमुरड्या विद्यार्थीनीला बंद वर्गात नेऊन त्या प्राध्यापकाने डाव साधला होता.