close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'संजय दत्त रासपमध्ये'; महादेव जानकरांची 'पुडी'

मुन्नाभाई संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार अशी घोषणा महादेव जानकरांनी केली.

Updated: Aug 25, 2019, 10:34 PM IST
'संजय दत्त रासपमध्ये'; महादेव जानकरांची 'पुडी'

गणेश कवाडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : मुन्नाभाई संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार अशी घोषणा महादेव जानकरांनी केली. जानकरांच्या या घोषणेमुळे एकच खळबळ माजली. पण यानंतर खुद्द महादेव जानकरांनाच सारवासारव करावी लागली आहे. रासपच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमात महादेव जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करेल, अशी माहिती दिली.

संजय दत्तनंही महादेव जानकरांना त्यांच्या अधिवेशनासाठी दुबईहून शुभेच्छा पाठवल्या. संजय दत्तच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली म्हटल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. भाषणानंतर जेव्हा पत्रकारांनी जानकरांना गाठलं तेव्हा जानकरांनी संजय दत्त फक्त प्रचार करणार असल्याचं सांगितलं.

जानकरांनी संजय दत्तच्या पक्षप्रवेशाची घोषणा करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. वस्तूस्थिती मात्र वेगळीच निघाली. त्यामुळं संजय दत्तच्या रासप प्रवेशाची बातमी औटघटकेची ठरली.