मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी : कोरोनाची रुग्ण संख्या स्थिर, मृत्यूदरही घटला

 मृत्यूदराचं प्रमाण गेल्या 70 दिवसांत 0.03 टक्क्यांवर 

Updated: Apr 21, 2021, 07:58 AM IST
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी : कोरोनाची रुग्ण संख्या स्थिर, मृत्यूदरही घटला title=

मुंबई : राज्यासह देशभरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर मुंबईकरांसाठी(Mumbai Corona) दिलासा देणारी बातमी समोर येतेय. मुंबई शहरात गेल्या सहा दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या स्थिर राहीलेली पाहायला मिळतेय. तसेच मुंबईतील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराचं प्रमाण गेल्या 70 दिवसांत 0.03 टक्क्यांवर राहीले आहे. 

मुंबईची ही रुग्णंख्या नियंत्रणात असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलंय. 

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी पालिका रुग्णालयांमध्ये 3 हजार 685 बेड रिकामे असून सध्या उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 87 टक्के रुग्ण हे लक्षणे नसणारे आहेत तर गेल्या 70 दिवसांत 953 रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात रुग्णसंख्या 

राज्यात 58,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज 351 करोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.56% एवढा आहे. शनिवार, रविवारच्या लॉकडाऊननंतर सोमवारी आतापर्यंतच्या तुलनेत 10 हजार कोरोनाबाझाल्याधित कमीची नोंद आहे. 

देशातील रुग्णसंख्या 

कोरोनाचा कहर पाहाता गेल्या 24 तासांत भारतात  1 हजार 716 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 2 लाख 59 हजार 170 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. आता पर्यंत भारतात 1 लाख 80 हजार 530 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर 1, 31,08,8582 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले आहेत.  देशात 20 लाख 31 हजार 977 रूग्मांवर उपचार सुरू आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x