मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयात चाय पे चर्चा सुरू असतात, हे आता आकडेवारीनिशी स्पष्ट झालंय. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री कार्यालयात केवळ चहापानावर 3 कोटी 34 लाख 64 हजार 905 रूपये खर्च झाल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी दिली.
याचा अर्थ दर महिन्याला 27 लाख रूपये, दिवसाला 93 हजार रूपये, तर दर मिनिटाला 64 रूपये केवळ चहावर खर्च होतो, अशी आकडेवारीच त्यांनी माहिती अधिकारातून मिळवलीय.
एवढा चहा कोणी पिऊ शकत नाही. यात चहा कमी आणि बिल जास्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली सुरू असलेल्या या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणी निरूपम यांनी केलीय.