'हा' वॉर्ड कोविड-१९ च्या टॉप १० यादीत

एप्रिल महिन्यात सर्वाधिक कमी रूग्ण असलेल्या यादीत होता समावेश 

Updated: Jun 21, 2020, 02:39 PM IST
'हा' वॉर्ड कोविड-१९ च्या टॉप १० यादीत  title=

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान मांडल आहे. मुंबईतही कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहे. चार वेळा वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊन करूनही रूग्ण संख्या आटोक्यात येत नाही. असं असताना मुंबईतील 'एस वॉर्ड' कोविड-१९ च्या टॉप १० यादीत समाविष्ट झाला आहे. 

'एस वॉर्ड' म्हणजे मुंबईतील भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि पवई परिसरात कोरोनाच्या रूग्णांची वाढ होत आहे. असं असताना एस वॉर्ड कोरोनाच्या यादीत आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यात एस वॉर्डमध्ये जवळपास ६०० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. तुलना केल्यावर मुंबईतील यादीत याचा आठवा क्रमांक लागतो. या वॉर्डमधील सर्वाधिक कोरोना रूग्ण हे झोपडपट्टी भागातील असले तरही पवईतील उच्चभ्रू वस्तीतही कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. 

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला एस वॉर्ड सर्वाधिक कमी रूग्ण असणाऱ्या यादीत होता. पण जून महिन्यात या वॉर्डमध्ये झपाट्याने रूग्णसंख्या वाढली आहे. १ जूनला एस वॉर्डमध्ये १७०५ कोरोनाग्रस्त होते तर १६ जूनला अवघ्या पंधरवड्यात रूग्णांची वाढ झपाट्याने झाली आणि हा आकडा ३१६६ वर पोहोचली. 

अवघ्या काही दिवसात रूग्ण संख्या दुपटीने वाढली. त्यानंतर १८७३ रूग्ण ऍक्टिव असून इतरांना घरी सोडण्यात आलं. के ईस्ट वॉर्डमध्ये ५१ टक्के रूग्ण ऍक्टिव होते तर एस वॉर्डमध्ये ५९ टक्के. एस वॉर्डमध्ये इतर वॉर्डच्या तुलनेत ३.८ टक्के सर्वाधिक रूग्ण होते. तर एस वॉर्डमध्ये आर नॉर्थ वॉर्डच्या तुलनेत कमी रूग्ण होते. आर नॉर्थमध्ये रूग्णांची वाढ ५.५ टक्क्याने होत होती. 

कांजुरमार्ग आणि भांडूप परिसरातील झोपडपट्टी भागात रूग्णांची संख्या वाढत होती. फुले नगर, तान्हाजी वाडी, सोनापूर, टेंभीपाडा, गावदेवी या भांडूप पश्चिमेकडील भागात रूग्ण वाढत होते. तर विक्रोळीत आंबेडकर चौक जो कन्नमवार नगरचा भाग आहे तिथे रूग्ण वाढत होते.