मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात 'या' बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी

पाहा कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावली मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात हजेरी. 

Updated: Dec 19, 2022, 12:17 PM IST
मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात 'या' बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी  title=

Salman Khan-Ranveer Singh and Shilpa Shetty in Mumbai Commissioner Vivek Phansalkar's Daughter Wedding Photo : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan), रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हे कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर तो ग्लॅमरस कार्यक्रमच म्हटला जातो. दरम्यान, या तिघांनी यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली, या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार्स त्यांच्या स्टायलिश लूकमध्ये पोहोचले. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ( Mumbai Commissioner Vivek Phansalkar) यांची मुलगी मैत्रेयी फणसळकर हिच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत सलमान, रणवीर आणि शिल्पा शेट्टीनं हजेरी लावली आहे. या दरम्यान, रणवीरनं तर परफॉर्म केलं. विवेक फणसळकर यांच्या मुलीच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

या कार्यक्रमात सलमान, रणवीर आणि शिल्पा स्टायलिश लूकमध्ये दिसले. सलमान खानचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर वधू-वरांचे अभिनंदन करताना दिसत आहे. यादरम्यान सलमानने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, ज्यामध्ये तो खूपच हॅंडसम दिसत होता. फोटोमध्ये मैत्रेयीनं सलमान खानचा हात पकडला होता. सोबतच रणवीर सिंगही डॅपर लूकमध्ये दिसला. रणवीरनं यावेळी गुलाबी रंगाची पँट आणि फ्लोरल ब्लेझरसह निळा शर्ट, तपकिरी रंगाची टोपी परिधान केली होती. शिल्पा शेट्टीनं लाल रंगाची साडी परिधान केली होती.

पाहा फोटो -

Salman Khan Ranveer Singh and Shilpa Shetty in Mumbai Commissioner Vivek Phansalkar s Daughter Wedding Photo

हेही वाचा : एकीकडे 'पठाण' ची कॉन्ट्रोव्हर्सी तर दुसरीकडे आजारपण; Shahrukh Khan ची अशी अवस्था झाली की...

Salman Khan Ranveer Singh and Shilpa Shetty in Mumbai Commissioner Vivek Phansalkar s Daughter Wedding Photo

Salman Khan Ranveer Singh and Shilpa Shetty in Mumbai Commissioner Vivek Phansalkar s Daughter Wedding Photo

दरम्यान, सध्या सलमान हा एक रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. याशिवाय 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' त्याचे हे दोन चित्रपटही येणार आहेत. सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ दिसत आहे. तर दुसरीकडे रणवीर सिंग सध्या 'सर्कस'चे प्रमोशन करत आहे. रोहित शेट्टीचा हा चित्रपट 23 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीरसोबत पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x