संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश? की...

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अपक्ष अर्ज दाखल करणारे संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिलीय.   

Updated: May 22, 2022, 06:25 PM IST
संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश? की... title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिलीय. अपक्ष आमदारांच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्री यांनी ही ऑफर दिल्याची माहिती दिली होती. संभाजीराजे यांना विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदतही देण्यात आली होती.

त्यानंतर आज शिवसेना शिष्टमंडळाने संभाजीराजे छत्रपती यांची ट्रायडंट हाँटेलमध्ये भेट घेतली. या शिष्टमंडळात शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता.

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या शिष्टमंडळाने संभाजीराजे छत्रपती यांना दिला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही फोनवरून संभाजीराजे छत्रपती यांच्याशी फोनवरून चर्चा केली. 
 
शिवसेना शिष्टमंडळाने उद्या सोमवारी दुपारी १२ वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याचे निमंत्रण संभाजीराजे छत्रपती यांना दिले. या पक्ष प्रवेशानंतरच संभाजी राजे छत्रपती यांची राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर घोषणा कर्मा असल्याची माहिती सूत्रंनी दिली. 

उद्या दुपारी १२ वाजेपर्यत संभाजीराजे यांना शिवसेनेचे पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.