मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरुन (Chief Minister) संजय राऊत (Sanjay Raut) यानेच खाली खेचण्याचं काम केलंय, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Cabinet Minister Narayan Rane) यांनी केला आहे. राणेंनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. (sanjay raut is responcible for uddhav thackeray step down chief minister post said narayan rane)
"संजय राऊत खूष आहेत. कारण त्यांचे गुरू शरद पवारांनी दिलेले काम राऊतांनी पूर्ण केलं. संजय राऊत हा जोकर आहे. त्याला पत्रकार मानत नाही मी. हा जोकर उद्धव ठाकरेंना नाचवतोय.संजय तू उद्धव ठाकरेला किती उघडं केलंय रे. काही दिवसांपूर्वी तू म्हणाला होता की उद्धव ठाकरेंचे कपडे उतरवीन. ते करून दाखवलं. संजय तू दिल्या घरी सुखी राहा", अशा शब्दात राणेंनी राऊतांवर हल्लाबोल केला.
"एकनाथ शिंदे यांना मारायलाही सुपारी दिली होती नक्षलावाद्यांना, हा काय पहिला प्रयोग नाही. साहेबांनी मोठी केलेली कार्यक्षम, कर्तबार माणसं शिवसेनेत तयार व्हायला लागली, त्यावेळेला एकेकाला कमी करण्याचं काम यांनी केलं", असं राणेंनी नमूद केलं.
"रमेश मोरे यांची हत्या कुणी केली. जयेंद्र जाधव यांची हत्या कोणी केली, ठाण्याचे एक नगरसेवक त्याची हत्या कोणी केली? नारायण राणे यांनी 2005 ला शिवसेना सोडली, तेव्हा देशातल्या, देशाबाहेरच्या गँगस्टर्सना सुपाऱ्या देण्यात आल्या. पण तेव्हा बोललो नाही, कारण मी समर्थ होतो तोंड द्यायला, मी वाचलो माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने. तुम्ही सावध राहा आम्ही नाही तर दुसरे करतील, असं ज्यांना माझी सुपारी दिली होती त्यांनी मला सांगितलं", असा गौप्यस्फोटही राणेंनी यावेळेस केला.