मुंबई : केंद्र सरकावर (Central Government) शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. सीबीआय, (CBI) ईडीचा (ED) वापर करत केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या सरकारवर दबाब टाकत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था यांच्यामाध्यमातून दबाव आणला, जात आहे आम्ही त्याच स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील सरकारवर प्रेशर टाकला जात. ते होणार हे माहीत आहे. संघर्ष करण्याची आम्हाला सवय आहे. प्रेशर पॉलिटिक्स कोणाला करायचं आहे , त्यांचं आम्ही स्वागत करतो. प्रेशर पॉलिटिक्स जे कोणी करत आहेत त्यांचं स्वागत आहे. जे कोणी हे करत कुठं केलं जातं सर्व आम्हाला माहीत आहे. व्यंगात्मक टीका आहे , ज्याला जे कळलं ते समजून घेतील, असा टोला त्यांनी भाजपला मारला.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2020
केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन ज्यांना कोणाला यातून विकृत आनंद मिळत आहे, त्यांनी तो त्यांनी घेतला पाहिजे. महाराष्ट्रमध्ये एक संस्कृती आहे , वेगळी परंपरा आहे. आता जे चाललं आहे, ही इस्ट इंडिया कंपनीची परंपरा आहे. आपल्या हवं आहे ते मिळवणे, हेच यांचे काम आहे. विरोध करण हे विरोधी पक्षाच काम आहे. त्यांनी विधायक काम केलं पाहिजे. विरोधीपक्षाने आपली शक्ती लोकांच्या कामासाठी लावली पाहिजे, असा सल्ला यावेळी राऊत यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. यावर ते बोलताना म्हटले, पुण्यात सर्वांचे स्वागत केलं जाते. मोदी देशाचं पंतप्रधान आहेत. त्यांच्याबद्दल कायम आदर आहे. तर कंगना प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले, महापौर किशोरी पेडणेकर यांनी सूचक विधान केलं आहे. बेकायदेशीर बांधकाम वर कारवाई होती , बेकायदेशीर बांधकामवरील कारवाई बेकायदेशीर कशी ठरली, यासाठी मी संविधानाची काही पुस्तक शोधत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.