ED कोठडीत असलेल्या संजय राऊतांची पुन्हा मेडिकल टेस्ट, पहिली दृश्य समोर

शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. 1तारखेला रात्री त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना ईडी कोठडी मिळाली आहे. आता सोमवार 8 ऑगस्टपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मेघा कुचिक | Updated: Aug 5, 2022, 12:41 PM IST
ED कोठडीत असलेल्या संजय राऊतांची पुन्हा मेडिकल टेस्ट, पहिली दृश्य समोर  title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. 1तारखेला रात्री त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना ईडी कोठडी मिळाली आहे. आता सोमवार 8 ऑगस्टपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. 

संजय राऊत यांची तिसऱ्यांदा मेडिकल टेस्ट

संजय राऊत हे हार्टचे रुग्ण आहेत. हार्टशी संबंधित त्यांच्यावर शस्त्रक्रियादेखील झाल्या आहेत. याचमुळे त्यांच्या आरोग्याची अतिरिक्त काळजी ईडीला घ्यावी लागणार आहे. ईडीने अटक केल्यापासून त्यांची तिसऱ्यांदा मेडिकल टेस्ट केली आहे. आजही सकाळी जे. जे. रुग्णालयात त्यांची मेडिकल टेस्ट झाली.

आता सोमवारी त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाणार असून त्यांना रविवारी मेडिकल टेस्टसाठी पुन्हा जे. जे. रुग्णालयात नेले जाईल. तसेही आरोपीला कोर्टात हजर करण्यापूर्वी 48 तास आधी त्याची मेडिकल टेस्ट करावी लागते. अटक केल्यावर त्याच दिवशी म्हणजे 1 ऑगस्टला संजय राऊत यांची मेडिकल टेस्ट ईडीने केली होती. तर दुसऱ्यांदा कोर्टात हजर करण्यापूर्वी 3 ऑगस्टला संजय राऊत यांची दुसरी मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. तर आज 5 ऑगस्टला तिसऱ्या वेळी संजय राऊत यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली. ते हार्ट पेशन्ट असल्याचा मुद्दा त्यांच्या वकीलांनी कोर्टात मांडला होता. 

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. यामुळे वर्षा राऊत आज वकिलांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. संजय राऊत यांच्या चौकशीत, टाकलेल्या धाडीमध्ये मिळालेल्या कागदपत्रांद्वारे अजूनही काही गैरव्यवहार झाला असल्याचा संशय ईडीला आहे. याचमुळे या प्रकरणात संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्यासह अजून काही लोकांना 5, 6 आणि 7 ऑगस्टला ईडीने समन्स बजावला आहे.