शालेय बेस लाईन परीक्षेचे पेपर फुटले

आतापर्यंत दहावी, बारावी इतकंच काय, पदवी परीक्षेच्या पेपरफुटीची प्रकरणं उघडकीला येत होती.

Updated: Sep 11, 2017, 04:42 PM IST
शालेय बेस लाईन परीक्षेचे पेपर फुटले  title=

मुंबई : आतापर्यंत दहावी, बारावी इतकंच काय, पदवी परीक्षेच्या पेपरफुटीची प्रकरणं उघडकीला येत होती. पण आता चक्क शालेय परीक्षांचे पेपरही फुटू लागले आहेत.

दुसरी ते नववी इयत्तेत शिकणा-या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता तपासणा-या बेस लाईन परीक्षेचे पेपरही फुटू लागले आहेत. मुंबईत अशा प्रकारे पेपर फुटीच्या घटना सर्रास घडत आहेत.

मुंबईतल्या झेरॉक्स स्टॉल्सवर बेस लाइन परीक्षेच्या पेपरच्या प्रति अवघ्या १० ते १५ रुपयांमध्ये उपलब्ध होत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. मनसेच्या वांद्रे पूर्व इथल्या कार्यकर्त्यांनी हे पेपर झेरॉक्स स्टॉलवरून मिळवले.