मुंबई : स्कूल बस चालकांनी आपला नियोजीत संप मागे घेतला आहे. परिवहन आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आलाय. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यासाठी चालकांनी या संपाचा इशारा दिला होता.
परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, सोमवारी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (एसबीओए) संप मागे घेतला आहे. परिणामी, सुमारे ८ हजार स्कूल बस चालक-मालक आज 'स्कूल चले हम' असा नारा देत, विद्यार्थी सेवा सुरू ठेवणार आहेत.
सरकारी नियमांची चाचपणी करुन, अयोग्य अटींमध्ये सुधारणा करण्यात येईल. न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या मुद्द्यांवर सरकार हस्तक्षेप करणार नाही. व्हॅनविषयक सरकारी समिती धोरण सात दिवसांत जाहीर होईल, असे आश्वासन मिळाल्याने संप मागे घेतल्याची माहिती एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.