एसटीची १८ टक्के भाडेवाढ झाल्याने नवीन तिकीट दर पाहा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव लागू केलाय. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून तिकीट दरात वाढ होणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 15, 2018, 07:47 PM IST
एसटीची १८ टक्के भाडेवाढ झाल्याने नवीन तिकीट दर पाहा title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव लागू केलाय. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून तिकीट दरात वाढ होणार आहे. एसटीचा तोटा भरुन काढण्यासाठी, कर्मचाऱ्यांची पगार वाढ आणि इंधन दरवाढीमुळे ही भाडेवाढ करण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलेय. मात्र, सामान्यांची ओळख असलेल्या एसटीला आता किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागलेय. १८ टक्के भाडेवाढीमुळे तिकिटांचे दर प्रचंड वाढलेय. खासगी वाहतुकीचा विचार करता एसटीचा प्रवास खूपच महाग झालाय.

एसटी प्रवासाऐवजी रेल्वेला प्राधान्य?

दरम्यान, एसटीची दरवाढ ही पाच रुपयांच्या पटीने करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे यापुढे ७ रुपयांऐवजी ५ रुपये तर ८ रुपयांऐवजी १० रुपये नवे तिकीट दर असणार आहेत. त्यामुळे सुट्ट्यापैशांचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाने काढलाय. मात्र, १८ टक्के भाडेवाढ करण्यात आल्याने एसटीचे तिकीट दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी रेल्वेचा प्रवास करता येण्याजोगा आहे, त्याठिकाणी एसटी प्रवासी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देण्याची अधिक शक्यता आहे. एसटीच्या तिकिटापेक्षा कमी पैशाच रेल्वेचा चांगला आणि आरामदायी प्रवास करु शकणार आहे.

असे असतील नवे तिकीट दर

मुंबई - पुणे : साधी गाडी जुने - १७० तर नवीन १९५, रातराणी जुने २०१ तर नवीन २३० रुपये, शिवशाही - जुने २५४ तर नवीन २९० रुपये आणि शिवनेरी - जुने ४४७ तर नवीन ५३० रुपये असा तिकीट दर असणार आहे. म्हणजेच मुंबई - पुणे तिकीट दर हा १९५ ते ५३० रुपयांच्या दरम्यान आहे.

मुंबई - रत्नागिरी : साधी गाडी जुने - ४०३  तर नवीन ४६०, रातराणी जुने ४७७  तर नवीन ५४० रुपये, शिवशाही - जुने ६०१ तर नवीन ६८० रुपये आणि शिवनेरी - जुने १०५९ तर नवीन १२८० रुपये असा तिकीट दर असणार आहे. म्हणजेच मुंबई - रत्नागिरीचा प्रवास हा ५०० ते १३०० रुपयांच्या घरात असल्याने एसटीची प्रवासी रेल्वेला प्राधान्य देण्याची अधिक शक्यता आहे. कारण एसटीच्या तिकिटात रेल्वेचा वातानुकुलीत प्रवास परवाडणार आहे.

मुंबई - कोल्हापूर : साधी गाडी जुने - ४१०  तर नवीन ४६५, रातराणी जुने ४८४  तर नवीन ५५० रुपये, शिवशाही - जुने ६१० तर नवीन ६९० रुपये आणि शिवनेरी - जुने १०७६ तर नवीन १२८० रुपये असा तिकीट दर असणार आहे. 

मुंबई - औरंगाबाद :  साधी गाडी जुने - ४०३  तर नवीन ४६०, रातराणी जुने ४७७  तर नवीन ५४० रुपये, शिवशाही - जुने ६०१ तर नवीन ६८० रुपये आणि शिवनेरी - जुने १०५९ तर नवीन १२६० रुपये असा तिकीट दर असणार आहे.

मुंबई - नाशिक : साधी गाडी जुने - २०२  तर नवीन २३०, रातराणी जुने २३८  तर नवीन २७० रुपये, शिवशाही - जुने ३०१ तर नवीन ३४० रुपये आणि शिवनेरी - जुने ५२९ तर नवीन ६३५ रुपये असा तिकीट दर असणार आहे.