मुंबई : 'नो मराठी नो ऍमेझॉन मनसे'ची मोहीम अधिक आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ऍमेझॉनद्वारे विविध ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर फाडले. हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे सचिव यांना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस सत्र न्यायालयाकडून पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ऍमेझॉनच्या ऍपमध्ये मराठी भाषा असावी अशी मनसेचे मागणी आहे. मात्र मनसे ही मागणी पूर्ण करण्यास ऍमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. परिणामी ऍमेझॉन आणि मनसेचा वाद आता आता न्यायालयात पोहोचला आहे.
मनसे पदाधिकारी अखिल चित्रे हे न्यायालयात ऍमेझॉन विरोधात लढत आहेत. बुधवारी मनसे अध्यक्ष यांच्या वतीने जनहित-विधी कक्षाचे अध्यक्ष किशोर शिंदे व त्यांचे सहकारी हजर होते. याविषयी पुढील तारीख ५ जानेवारी २०२१ देण्यात आली आहे.
दरम्यान, दिंडोशी पाठोपाठ सांताक्रुझ विमानतळ विलेपार्ले हायवे परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी ऍमेझॉनच्या फलकांना काळं फासलं शिवाय ठिक-ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर देखील फाडले.