केशरी कार्ड धारकांना धान्य वाटपावर भुजबळ आणि पवारांची चर्चा

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज भेट घेतली.

Updated: Apr 4, 2020, 01:50 PM IST
केशरी कार्ड धारकांना धान्य वाटपावर भुजबळ आणि पवारांची चर्चा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई  : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज भेट घेतली. ही भेट शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झाली. या भेटीत केशरी रेशन कार्ड धारकांना अशा कठीण काळात धान्य वाटप करता येईल का? यावर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

केशरी कार्ड धारकांना यापूर्वी रेशनिंगवर धान्य दिलं जात नव्हतं. जर राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात या नागरिकांनाही धान्य देता येईल का? यावर विचार सुरू केला आहे.

केशरी कार्ड धारकांना रेशनिंग म्हणून धान्य वाटप करण्याचा निर्णय झाला, तर एका कुटूंबाला किती धान्य दिलं जाईल, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. राज्यात केशरी कार्ड धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

राज्यात यापूर्वी ५ ते ८ वीपर्यंतच्या मुलांना ५ किलो तांदुळ आणि डाळींचं  वाटप सुरू करण्यात आलं आहे, पोषण आहाराच्या बदल्यात हे धान्य वाटप झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.