'सिल्वर ओक'वर वादळापूर्वीची शांतता?

शरद पवार सकाळीच रवाना 

Updated: Nov 25, 2019, 08:14 AM IST
'सिल्वर ओक'वर वादळापूर्वीची शांतता? title=

मुंबई : गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र एका वेगळ्याच राजकीय नाट्यमय घडामोडींना सामोरा जात आहे. त्यातच शनिवारी सकाळी पहिल्यांदाच इतिहासातील 'राजकीय भूकंप' महाराष्ट्राने अनुभवला. शनिवार आणि रविवार हा अतिशय राजकीय घडामोडींचा ठरल्यानंतर आज शरद पवारांचे मुंबईचे निवास्थान 'सिल्वर ओक' शांत पाहायला मिळणार आहे. ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना असा देखील कयास लावला जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पहाटेच कराडला निघाले. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पवार कराडला जात आहेत. सकाळी आठ वाजता प्रिती संगमावर पवार श्रद्धांजली अर्पण करणार असून त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीला पवार हजेरी लावतील. या कार्यक्रमात पवारांच्या हस्ते एक पुस्तक प्रकाशन देखील होणार आहे. संध्याकाळी साताऱ्यात साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला आणि एका कॉलेजच्या उदघाटनाला ते उपस्थित असतील. त्यानंतर संध्याकाळी शरद पवार पुन्हा मुंबईत परतणार आहेत. (हे पण वाचाअजित पवारांचा बंड फसला - सामना

अजित पवारांनी भाजपला समर्थन देऊन फडणवीस सरकारसोबत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शुक्रवारी 'रात्रीस खेळ चाले' असा प्रकार घडल्यानंतर हे राजकीय नाट्य अजूनही सुरूच आहे. अजित पवारांसोबत गेलेल्या 12 आमदारांपैकी फक्त आता 1 आमदार त्यांच्यासोबत राहिले असून 11 आमदार शरद पवारांकडे परतले आहेत. यावरून अजित पवारांनी पुकारलेला बंड फसल्याचं दिसतं आहे. (हे पण वाचाराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष) 

या दिवसभराच्या घडामोडीनंतर शरद पवार पुन्हा मुंबईत परतल्यावर आणखी काय घडामोडी घडतील. तसेच शरद पवार या दिवसभराच्या घटनाक्रमावर काय भाष्य करतील? याकडे सगळयांच लक्ष लागून राहिलं आहे.