Sanjay Raut | ईडी कारवाई विरोधात मुंबईत शिवसैनिक आक्रमक, दिल्लीत महाविकासआघाडीची 'चाय पे चर्चा'

संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Updated: Apr 5, 2022, 06:55 PM IST
Sanjay Raut | ईडी कारवाई विरोधात मुंबईत शिवसैनिक आक्रमक, दिल्लीत महाविकासआघाडीची 'चाय पे चर्चा' title=

मुंबई : संजय राऊतांच्या घरी महाविकासआघाडी आणि शिवसेना खासदारांची बैठक सुरु आहे. विनायक राऊत, गजानन किर्तीकर, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे बैठकीला उपस्थित आहेत. संजय राऊत यांनी चहापानाचे आमंत्रण दिले होते. राऊत यांच्यावरील कारवाई वरून बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील या चहापानाच्या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या नीलम गौऱ्हे, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार देखील उपस्थित आहेत. शिवसेनेचे मंत्री दादासाहेब भुसे देखील उपस्थित आहेत. महाविकासआघाडीतील अनेक मोठे नेते संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नेते येत आहेत. संजय राऊत त्यांचे स्वागत करत आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊतांवर ईडीनं मोठी कारवाई केली. राऊतांचे अलिबागमधील आठ प्लॉट्स आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतल्या १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर भांडुपमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

संजय राऊत यांचा दादरमधला एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. हे राहातं घर होतं, आणि हा फ्लॅट टू बीएचकेचा आहे. दादरमधला हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून संजय राऊतांची पत्नी वर्षी राऊत यांना पंचावन्न लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्यात आल्याचा आरोप आहे.  तर रायगडमधल्या अलिबागमधले आठ प्लॉट जप्त करण्यात आलेत. किहीम बीचवरचे हे प्लॉट राऊतांची पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकरांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावावर आहेत. हे प्लॉट ईडीनं ही कारवाई केलीय.