जीएसटी,नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान - शिवसेना

भाजपची सत्ता येताच ‘महागाईवर’ छत्रचामरे धरणारा ‘जीएसटी’त्याच मोदींनी लागू केला. मोदी जीएसटीचे समर्थक बनले. हा एक प्रकारे घूमजाव होता. जीएसटी व नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 9, 2017, 08:30 AM IST
जीएसटी,नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान - शिवसेना title=

मुंबई : भाजपची सत्ता येताच ‘महागाईवर’ छत्रचामरे धरणारा ‘जीएसटी’त्याच मोदींनी लागू केला. मोदी जीएसटीचे समर्थक बनले. हा एक प्रकारे घूमजाव होता. जीएसटी व नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

सरकारने मान झुकवली

दरम्यान, सरकारने जीएसटीच्या अनेक अटी शिथील केल्या त्याबाबत शिवसेनेने सरकारचे अभिनंदन केले आहे. पण, सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे देशातील जनतेचा विजय आहे. ‘जीएसटी’बाबत मोदी सरकारने जनक्षोभापुढे मान झुकवली आहे व अनेक करांत सवलती जाहीर करून जनतेला ‘दिवाळी’ साजरी करण्याची तरतूद केली आहे, असे सांगत आपल्या सत्तासहभागी मित्रपक्षाचे येथेच्छ वाभाडेही काढले आहेत.

पंतप्रधान मोदींचा घुमजाव

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामात उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहीला आहे. या लेखात ठाकरे यांनी जीएसटी आणि नोटबंदीच्या मुद्द्यावरून सरकारला चिमटे काढले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी जीएसटीला कडाडून विरोध केला होता. समान करप्रणालीची त्यांनी खिल्ली उडवली होती, पण भाजपची सत्ता येताच ‘महागाईवर’ छत्रचामरे धरणारा ‘जीएसटी’ त्याच मोदींनी लागू केला. मोदी जीएसटीचे समर्थक बनले. हा एक प्रकारे घूमजाव होता. जीएसटी व नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले. अर्थव्यवस्थेची घसरगुंडी सुरूच आहे. ती रोखण्यासाठी शेवटी सरकारला लोकक्षोभापुढे झुकावे लागले, अशा स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.