मुंबई : मुंबईतल्या महालक्ष्मी परिसरात एसआरएच्या इमारत क्रमांक 1 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाला वेळीच पाचारण करण्यात आल्याने पुढचा अनर्थ टळला. या इमारतीत अग्निशमन दलाच्या नियम, अटींची पुर्तता केली होती का ? याची चौकशी सध्या सुरू आहे.
एसआरएच्या इमारत क्रमांक 1 मधून धुराचे लोट दिसून लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भिती पसरली. काही काळ नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं होतं. अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी जात आग विझवली. त्यामुळे सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे इमारतीत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
भेंडी बाजारमध्ये मौजूद वजीर नावाच्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री सव्वातीनच्या सुमारास आग लागली. साधारण अर्ध्या तासात ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.