उदयनराजे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटलांना उमेदवारीची शक्यता

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी नकार दिल्यानंतर

Updated: Oct 1, 2019, 11:25 AM IST
उदयनराजे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटलांना उमेदवारीची शक्यता title=

मुंबई : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरोधात श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील हे 3 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी नकार दिल्यानंतर, राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांचं नाव पुढे आलं आहे.

उदनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर, त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सातारा लोकसभेची जागा खाली झाली होती. उदयनराजे यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडून आले होते.

शरद पवारांनी आपल्याविरोधात फॉर्म भरला तर आपण उमेदवारी दाखल करणार नसल्याचं उदयनराजे म्हणाले होते, पण आता राष्ट्रवादीकडून त्यांच्याविरोधात श्रीनिवास पाटील यांचं नाव पुढे येत आहे.

श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी राज्यपाल पद देखील भूषवलं आहे. तसेच 1999 ते 2009 अशा दोन टर्म ते कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार देखील होते.