Social Distance : कोरोना संकट - उद्धव ठाकरे यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी  उद्धव ठाकरे यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक.

Updated: Mar 26, 2020, 07:11 PM IST
Social Distance : कोरोना संकट - उद्धव ठाकरे यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक title=

मुंबई : कोरोनाचा प्रार्दुभाव (coronavirus) होत आहे. कोरोना बाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. दिवस भरातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट मोठे असल्याची चाहूल लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरातच राहणे गरजेचे आहे. बाजारात कोणीही गर्दी करु नये. तसेच योग्य अंतर ठेवून गरज असेल तर व्यवहार करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister  Uddhav Thackeray) यांनी आज प्रथमच वर्षा निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी योग्य ती खबरदारी (Social Distance) घेतली. 

कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. (coronavirus) कोरोनाचे संकट परतवून लावायचे आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे बाजारात गर्दी करु नका, नियमांचे पालन करा. योग्य सुरक्षित अंतर ठेवा. (Social Distance) मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray)  यांनी दिली आहे.

वैद्यकीय स्टोअर्स, किराणा दुकान आणि इतर जीवनावश्यक सेवा खुल्या ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने चोवीस तास दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली. दुकानात गर्दी झाल्याने सरकारने यामुळे ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी दुकाने २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला मुख्य सचिव, महापालिका आयुक्त आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. तसेच या बैठकीत सामाजिक अंतर देखील राखले गेले. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली गेली.

सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना चोवीस तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.

कोरोना उपयाययोजना संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बंदिस्त वातावरण टाळून आणि अधिकाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेत योग्य अंतर (Social Distance) ठेवून ही बैठक घेण्यात आली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. संपूर्ण राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. जे संशयित आहेत त्यांना  होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना घराबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र,  क्वारंटाइनमधील अनेक जण बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांची धावपळ उडत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. अन्यथा कोरोनाचे संकट तुमच्याही घरी पोहोचेल, अशा सूचना सरकारकडून करण्यात आल्यात.

राज्य सरकार, प्रशासन, आरोग्य यंत्रणा करोनाशी लढा देत आहे. कोरोनाग्रस्तांसह संशयित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काही जणांना होम क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. होम क्वारंटाइनमधील लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.