सुशांतसिंह प्रकरण : सीबीआय चौकशीत सिद्धार्थ-नीरजच्या जबाबात विरोधाभास

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयला आज काही महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 23, 2020, 03:47 PM IST
सुशांतसिंह प्रकरण : सीबीआय चौकशीत सिद्धार्थ-नीरजच्या जबाबात विरोधाभास title=

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयला आज काही महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या चौकशीचा आज तिसरा दिवस आहे. सीबीआय सध्या सुशांतचा कूक नीरजची तिसऱ्यांदा, सिद्धार्थ, दीपेश आणि केशव यांची दुसऱ्यांदा चौकशी करत आहे. या सगळ्यांच्या जबाबांमध्ये विरोधाभास आल्यामुळे सीबीआयला चौकशीत महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात.

सीबीआयकडून या सगळ्यांची १३ आणि १४ जूनला नेमकं काय झालं? याबाबत चौकशी सुरू आहे. सिद्धार्थ पिठानीकडून याबाबतची माहिती घेतली जात आहे, की तो रिया आणि सुशांतला कसा ओळखत होता आणि ८ जूनला रिया सोडून गेली, त्याचं कारण काय होतं? यासगळ्यांच्या विरोधाभासी उत्तरांमुळे संशय आणखी वाढत चालला आहे. 

सिद्धार्थ आणि नीरजच्या जबाबात विरोधाभास आल्यामुळे सीबीआय आता दोघांची समोरा-समोर चौकशी करत आहे. तर दुसरीकडे सीबीआयची टीम कधीही रियाच्या घरी जाऊन तिची चौकशी करण्याची शक्यता आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये सीबीआयने सुशांतचा कूक आणि त्याच्या काही मित्रांची चौकशी केली. या चौकशीनंतर सीबीआय रिया आणि तिच्या कुटुंबाचाही जबाब नोंदवेल.

यासोबतच डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये फॉरेन्सिक टीम आणि मुंबई पोलिसांचीही एक टीम पोहोचली आहे. तर सीबीआयची एक टीम पुन्हा सुशांतच्या घरी पोहोचली आहे.