ST कर्मचाऱ्यांना आझाद मैदान खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना, पण कर्मचारी म्हणाले...

Sharad Pawar यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलं आहे.

Updated: Apr 8, 2022, 07:49 PM IST
ST कर्मचाऱ्यांना आझाद मैदान खाली करण्याच्या पोलिसांच्या सूचना, पण कर्मचारी म्हणाले... title=

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर (ST workers protest) आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान (Azad maidan) खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस मैदानात जाऊन एसटी कर्मचारी यांना बाहेर निघण्याचे आवाहन करत आहेत. पण एसटी कर्मचारी बाहेर जाण्यासाठी तयार नाहीत. जे सदावर्ते सांगतील तेच आम्ही ऐकणार अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता पोलीस विरुद्ध एसटी कर्मचारी संघर्ष होण्याची शक्यता आहे. 

'गुणरत्ने सदावर्ते म्हणाले आझाद मैदान खाली करा तरच आझाद मैदान खाली करणार' अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. पण जर पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने मैदान खाली करण्यास सांगितले तर यामुळे संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. आझाद मैदानात एस टी कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी सुरू आहे.

आज अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर धडक दिली. पवारांच्या सिल्व्हर ओक या घराबाहेर मोठा राडा झाला. शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी 100 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.