एसटी संप सुरुच राहणार; खोत, पडळकर यांना आंदोलनातून आझाद केले - सदावर्ते

ST bus strike​ News :  आम्ही खोत पडळकरांना आंदोलनातून आझाद केले आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

Updated: Nov 25, 2021, 02:25 PM IST
एसटी संप सुरुच राहणार; खोत, पडळकर यांना आंदोलनातून आझाद केले - सदावर्ते title=
संग्रहित छाया

मुंबई : ST bus strike News : आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरतं मागे घेतले आहे, अशी घोषणा सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांनी केली. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आम्ही खोत पडळकरांना आंदोलनातून आझाद केले आहे. खोत, पडळकरांची स्थगिती स्वतःपुरती आहे, अशी भूमिका अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे.

माझ्या आवाजाला माइकची गरज नाही. माइकवाले निघून गेले, अशी टीका सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडाळकर यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपयश असल्याचे म्हटले. 

40 लोकांच्या आत्महत्या हा व्यवस्थेने केलेला खून आहे. शरद पवार यांनी कष्टकऱ्यांना तोडले, भांडण लावले, माणसं पळवली देवाण घेवाण केली. पण कष्टकरी तुटला नाही. संजय राऊत फक्त शिवसेनेसाठी रोखठोक आहेत. बाकी काही नाही. खोत पडळकर यांची पत्रकार परिषद पोलीस गराड्यात झाली आहे. खोत - पडळकर यांना एसटी कर्मचारी आंदोलनातून आझाद करत आहे. वयोवृद्ध खोत आणि पडळकर यांनी एकट्याने पुकारलेला हा लढा नव्हता, अशी टीका त्यांनी केली.

ही लोकचळवळ आहे. खोत-पडळकर यांनी स्वतःपूर्ती आंदोलनातून स्थगिती दिली आहे. खोत-पडळकर यांच्या आंदोलन स्थगितील कामगारांनी ठोकारले आहे, असे सांगताना सदावर्ते यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. तर सीताराम कुंटे जास्त शहाणपणा असलेला माणूस आहे, असे ते म्हणाले.

शेतकरी संघटनेची मुलं एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ आले होते. त्यांना अनिल परब यांच्या सांगण्यावरून अटक करण्यात आली आहे. अनिल परब यांच्यासोबत जी बैठक झाली. त्यात एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण हीच मागणी मांडली. पत्रकार परिषदेत मंत्री आणि दोन आमदारच का होते ? उपस्थित असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना का पत्रकार परिषदेत बसवले नाही. या लोकांना आतमध्येच थांबवून ठेवण्यात आले. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सदावर्ते यांनी यावेळी केली.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, अनिल परब यांची राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत. 26 नोव्हेंबर संविधान दिनी प्रत्येक डेपोच्या ठिकाणी कुटूंबासह एस टी कर्मचारी आंदोलन करतील. मी कुटूंबासह आझाद मैदानात आंदोलन करायला तयार आहे.खोत पडळकर यांनी आझाद मैदानात सोयी सुविधा दिल्या नाहीत. तर उच्च न्यायालयातून मी मिळवून दिल्या. आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी हात लावला तर त्यांना न्यायालयीनबाबीला समोर जावं लागेल, अशा इशारा यावेळी सदावर्ते यांनी दिला.