मुंबई : 2008 नंतर प्रथमच एका दिवसात शेअर बाजार २००० अंकांनी गडगडला आहे. शेअर बाजारातील एवढी मोठी घसरण ही धक्कादायक आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. यामुळे फक्त चीनचाच नाही तर संपूर्ण देशाच्या बाजार कोलमडला आहे.
सोमवारचा दिवस हा शेअर बाजारातील अत्यंत धक्कादायक दिवस ठरला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेंसेक्स 1942 अंकांनी कोसळून 35,635 वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निफ्टी 538 अंकांनी घसरून 10,451 वर बंद झाला. शेअर बाजारात आलेल्या या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचे 6 लाख 50 हजार रुपये बुडाले. सेंसेक्समध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे.
कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण
सौदी अरेबियाने कच्चा तेलाच्या उत्पादनाचा निर्णय घेतल्यानंतर तेलांच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. कच्चा तेलाच्या दरात 30 टक्के घसरण झाली आहे. पहिल्या युद्धानंतर कच्चा तेलाच्या दरातील ही सर्वात मोठी घसरण आहे. सौदी अरेबियाच्या निर्णयानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसीने शेअरमध्ये 12 टक्के घसरण झाली आहे.
कोरोना व्हायरसची लागण
जीवघेणा कोरोना व्हायरस जगभरात पसरत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेचं भरपूर नुकसान झालंय. जगभरात या वायरसची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 1 लाख 7 हजार आहे. इटलीत 24 तासांच 130हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. देशातील अनेक भागांना कोरोनाने लॉकडाऊन केलंय.
यस बँकेमुळे गुंतवणूकदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण
ट्रेडर्सच म्हणणं आहे की, यस बँकेच्या संकटामुळे देशातील बँकिंग व्यवस्थेच्या विश्वासावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ज्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोपच उडाली. यस बँकेंची रेटिंग डाऊन झाली आहे. यामुळे बँकांवरचा विश्वास हळूहळू उडू लागला आहे.
वैश्विक बाजारात मोठी घसरण
जगभरातील अनेक बाजारात फक्त लाल रंगाची भीती पाहायला मिळत आहे. देशांतर्गत असलेल्या बाजाराला मोठा फटका बसत आहे. जापानच्या निक्केईमध्ये 5.2%, ऑस्ट्रेलिया शेअर बाजारात 6.4% घसरण पाहायला मिळाली.