कंत्राटदारांच्या अडेलतट्टूपणामुळे मुंबईत कचरा प्रश्न घेणार पेट!

मुंबईत कचऱ्याचा प्रश्न पेटणार आहे. घोटाळा करणारे कंत्राटदार शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करु लागलेत. २७ जानेवारीपासून मुंबईतला कचरा उचलणार नाही, असा धमकीवजा इशारा कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेला पत्राद्वारे दिला आहे.

Updated: Jan 17, 2018, 05:17 PM IST
कंत्राटदारांच्या अडेलतट्टूपणामुळे मुंबईत कचरा प्रश्न घेणार पेट! title=

मंबई : मुंबईत कचऱ्याचा प्रश्न पेटणार आहे. घोटाळा करणारे कंत्राटदार शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करु लागलेत. २७ जानेवारीपासून मुंबईतला कचरा उचलणार नाही, असा धमकीवजा इशारा कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेला पत्राद्वारे दिला आहे.

कचऱ्यात डेब्रिजची भेसळ केल्याप्रकरणी 8 कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. कंत्राटदारांनी पालिकेला दिलेलं पत्र झी 24 तासच्या हाती लागलं आहे. पालिकेची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांकडून पालिकेला इशारा देण्यात आलाय.

कचऱ्यात डेब्रिजची भेसळ केल्याप्रकरणी चार महिन्यांपूर्वी पालिकेने पोलिसांत तक्रार देत संबंधित कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या कारणे दाखवा नोटीशीमुळे नवे कचरा वाहतुकीचे काम मिळवण्यात या कंत्राटदारांना अडचण येतेय. त्यामुळेच ही कारणे दाखवा नोटीस मागे घेण्यासाठी कंत्राटदारांनी पालिकेवर दबावतंत्र टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील कचरा न उचलण्याचा इशारा देऊन कंत्राटदारांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आता आरोप होऊ लागलाय.