मुंबई : नौदलाच्या सुरक्षा रक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ट्रॉम्बे येथील ही घटना आहे. कर्तव्य बजावत असताना सुरक्षा रक्षकाने डोक्यात गोळी झाडली. दरम्यान, या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांनी तणावातून हे कृत्य केले का, याची चर्चा सुरु झाली आहे.
मुंबईच्या नौदलाच्या ट्रॉम्बे विभागात केसर सिंग या 56 वर्षीय भारतीय नौदलच्या कर्मचाऱ्याने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11.30 च्या दरम्यान घडली. त्यामुळे काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ट्रॉम्बे येथील नौदलाच्या शस्त्रागार येथे ते सुरक्षा रक्षक म्हणून केसर सिंग कार्यरत होते. आज सकाळी टेहाळणी मनोर्यावर कर्तव्यावर तैनात होते. याचवेळी त्यांनी त्यांच्याकडील 7.62 एम एमच्या एसएलआर बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली.
या घटनेची माहिती मिळताच ट्रॉमबे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शव शवविच्छेदनसाठी जे जे रुग्णालयात पाठवला आहे. या सैनिकांने आत्महत्या का केली, याचे कारण मात्र अजून समोर आलेले नाही. केसर सिंग यांना कोणता मानसिक तणाव होता का ? आणि ही आत्महत्याच आहे ना याचा तपास पोलीस करीत आहेत.