तेंडुलकर कुटुंबीयांना कोण आणि का त्रास देतंय?

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट सुरू करण्यात आलं. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. हे सगळं करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अंधेरीतून अटक करण्यात आलीय. त्याची रवानगी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. नितीन सिसोदे असं या आरोपीचं नाव आहे.

Updated: Feb 8, 2018, 10:50 PM IST
तेंडुलकर कुटुंबीयांना कोण आणि का त्रास देतंय?  title=

अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट सुरू करण्यात आलं. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. हे सगळं करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अंधेरीतून अटक करण्यात आलीय. त्याची रवानगी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. नितीन सिसोदे असं या आरोपीचं नाव आहे.

साराच्या नावानं ट्विट

'Everyone knows that Shard pawar NCP looted maharashtra state but little known that he tried center too' अशा प्रकारचे ट्विट साराच्या नावे असलेल्या या ट्वीटर अकाऊंटवर हा मेसेज झळकला आणि तेंडुलकर कुटुंबियांची झोप उडाली... 

या सर्व प्रकरणाची शाहनिशा केल्यावर १६ ऑक्टोबर २०१७ या तारखेला सचिन तेंडुलकरने स्वतः त्याच्या ट्वीट करून माझी मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन कोणतंही ट्वीटर अकाऊंट वापत नाहीत, त्यामुळे जे ट्वीट करण्यात आलंय त्याचा आमच्याशी संबंध नाही असं ट्वीट केलं.

एकाला अटक

मग साराच्या नावे ट्वीट केलं कोणी? बनावट अकाऊंट सुरू करून तेंडुलकर कुटुंबियांना त्रास देणारा कोण? याचा शोध सुरू झाला. सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आणि ७ फेब्रुवारी २०१८ ला मुंबई पोलिसांनी अंधेरीत नितीन शिसोदे नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली. 

सेकंड हँड लॅपटॉप आणि कॉम्प्युटरचा व्यवसाय करणाऱ्या ३९ वर्षीय नितीन शिसोदेकडून लॅपटॉप, 2 मोबाईल फोन, राऊटर, संगणकाचे भाग जप्त करण्यात आले. 

काही दिवसांपूर्वीच साराशी मला लग्न करायचंय मी तिला किडनॅप करणार आहे असे २० फोन कॉल करून एका माथेफिरूने तेंडुलकर कुटुंबियांना त्रास दिला होता. आता साराच्या बनावट ट्वीटर अकाऊंटने तेंडुलकर कुटुंबियांना हैराण केलंय. सचिन तेंडुलकरने क्रिकेट मैदानात भारताचा तारणहार ही भूमिका बजावलीय. मात्र, आता त्याच्या मागे हे असले विकृत नष्टचर्य लावणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त होण्याची गरज आहे.