तेजस ठाकरेंकडून खेकड्यांचा 11 नव्या प्रजातींचा शोध

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांचं अभिनंदन केलंय.

Updated: Jun 26, 2018, 05:50 PM IST
तेजस ठाकरेंकडून खेकड्यांचा 11 नव्या प्रजातींचा शोध title=

मुंबई : उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांचं अभिनंदन केलंय. खेकड्याच्या नव्या 11 प्रजातींचा शोध लावलायय. त्यात एका दुर्मिळ प्रजातीचाही समावेश आहे.  या कामगिरीसाठी तेजसचं उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी इंस्टाग्रामवर अभिनंदन केलंय. फेब्रुवारी 2016 मध्ये तेजसने पश्चिम घाटात खेकड्याच्या एका दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता. त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती. वन्य प्राणी जगतावर संशोधन करणाऱ्या एका मॅगझीनने या खेकड्याच्या प्रजातीचं गुबरमातोर्निया थॅकरी (ठाकरे) हे नामकरण केलं होतं.