ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात असहिष्णू राजवट- आशिष शेलार

कंगना राणौतविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर शेलार आक्रमक

Updated: Sep 8, 2020, 06:51 PM IST
ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात असहिष्णू राजवट- आशिष शेलार title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत हिच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात असहिष्णू राजवट असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. ते मंगळवारी विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावाचा निषेध केला. 

'रियानंतर पुढची अटक कोणाला? ठाकरे परिवार आणि सरकारला भीती'

अभिनेत्री कंगना राणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर सडकून टीका केली होती. यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यामुळे सर्व स्तरांतून कंगना राणौतविरोधात टीकेची झोड उठली होती. 
या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी कंगनाच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला. तर मुंबई पोलिसांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. सिनेसृष्टीतील ईस्लामी वर्चस्व संपवल्याच्या कंगनाच्या वक्त्तव्याचा समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही निषेध केला होता. 

कंगना राणौतचे मुंबई पोलीस, राज्याच्या गृहमंत्र्यांना पुन्हा खुले आव्हान

दरम्यान, कंगना राणौत उद्या मुंबईत दाखल होणार आहे. त्यावेळी शिवसेनेकडून कंगना राणौतविरोधात आक्रमक निदर्शने होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयाला मुंबईमहानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली. कंगनाने निवासी जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. हे अनधिकृत बांधकाम स्वतः काढून टाका नाही, तर पालिका हे बांधकाम तोडणार असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.