अनुपस्थित विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला परीक्षा - मुंबई विद्यापीठ

विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. यांची परीक्षा ६ जानेवारी विशेष परीक्षा होणार आहे. 

Updated: Jan 5, 2018, 08:20 AM IST
अनुपस्थित विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला परीक्षा - मुंबई विद्यापीठ  title=

मुंबई : १ जानेवारीला भिमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीचे पडसाद राज्यभरात उमटले. महाराष्ट्र बंदच्या हाकेला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला.

दैनंदिन जिवनावर याचा परिणाम झाला. यावेळी मुंबई विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांची परिक्षा हुकल्या. या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. यांची परीक्षा ६ जानेवारी विशेष परीक्षा होणार आहे. 

मुंबई विद्यापीठाचा निर्णय

जे विद्यार्थी ३ वाजता असलेल्या परीक्षेला पोहचू शकले नाहीत, पोहचणार नाहीत त्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर यासंदर्भातील परिपत्रक उपलब्ध आहे. 

परीक्षा विभागाची बैठक

महाराष्ट्र बंदचे मुंबईत अधिक पडसाद बघायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची बैठक बोलवण्यात आली होती. आंदोलनाचे रूप पाहता परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला.

वेळ आणि ठिकाणात बदल नाही 

या परीक्षांची वेळ आणि ठिकाणांत कोणताही बदल करण्यात आला नसल्याने नियोजित वेळ आणि परीक्षा केंद्रावर हे पेपर होणार आहेत. 

बंदमुळे विद्यार्थ्यांना अडचण

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता या परीक्षांच्या वेळा होत्या.

आधी जे विद्यार्थ्यी उशिरा येतील त्यांना वेळ वाढवून देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता परीक्षेला पोहोचू न शकणा-या विद्यार्थ्यांना नंतर परीक्षा देता येणार आहे.