मुंबई लोकलच्या महिला डब्ब्यात चोरटा घुसला, चोराशी दोन हात करताना महिलेचा मृत्यू

मध्य रेल्वेवर (Central Railway)  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांना लोकल (  Mumbai local) प्रवास बंदी आहे. मात्र, असे असताना चोरटे बिनधास्त लोकलमधून प्रवास करत असल्याची बाब पुढे आली.  

Updated: Jun 1, 2021, 02:39 PM IST
मुंबई लोकलच्या महिला डब्ब्यात चोरटा घुसला, चोराशी दोन हात करताना महिलेचा मृत्यू title=

ठाणे : मध्य रेल्वेवर (Central Railway)  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना काळात सर्वसामान्यांना लोकल (  Mumbai local) प्रवास बंदी आहे. मात्र, असे असताना चोरटे बिनधास्त लोकलमधून प्रवास करत असल्याची बाब पुढे आली. मोबाईल चोरट्याने महिला डब्ब्यात प्रवेश करुन महिल्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतले. त्यानंतर चोरट्याने लोकलमधून खाली उडी मारुन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका महिलेने धाडस दाखवत त्याचा पाठलाग केला. तिने लोकमधून उडी टाकत चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न तिच्या मृत्यूचे कारण ठरला.

 मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकावर (Kalwa railway station) मोबाइल चोरांशी झुंज देत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विद्या पाटील असे या महिलेचे नाव असून ती महिला अंधेरीहून कल्याणकडे जात होती. ही महिला हवाई बंदरात कार्गो विभागात नोकरी करत होती.

कळवा स्थानकावरुन लोकल सूटल्यानंतर चोर महिला डब्ब्यात घुसला.  यावेळी महिला डब्ब्यात केवळ पाच महिला प्रवास करत होत्या. काही महिलांचे मोबाईल चोरल्यानंतर चोराने लोकल रेल्वेतून उडी मारली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यानेही चोरानंतर लोकलमधून उडी मारली. चोराला रोखण्याचा प्रयत्न केला. चोराशी झालेल्या भांडणाच्या वेळी चोरट्याने जोरदार ढकलल्याने विद्या पाटील या स्थानका खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, विद्या कोसळल्याचे लक्षात येताच मोबाईल चोर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे, रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे मोबाईल चोरट्याचा शोध घेत आहेत.