दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला : राहुल गांधी, शरद पवार यांची एकत्र सभा कधी?

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. मात्र, राहुल गांधी आणि शरद पवारांची अद्याप एकही सभा एकत्र झालेली नाही. 

Updated: Apr 17, 2019, 06:41 PM IST
दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला : राहुल गांधी, शरद पवार यांची एकत्र सभा कधी? title=

मुंबई : निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. मात्र, राहुल गांधी आणि शरद पवारांची अद्याप एकही सभा एकत्र झालेली नाही. या दोघांची संयुक्त सभा कधी होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. राज्यातील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचारही संपला आहे. ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवत असले तरी अद्याप शरद पवार आणि राहुल गांधींची एकत्र सभा झालेली नाही. एकत्र निवडणूक लढताना कार्यकर्त्यांचीही मनं जुळली असल्याचा दावा हे दोन्ही पक्ष करत आहेत. दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते मात्र अद्याप एका व्यासपीठावर दिसलेले नाहीत. याबाबत मुंबईतल्या नेत्यांनाही फारशी कल्पना नाही. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकत्र सभांची गरज नसल्याचे म्हटले आहे. 

काँग्रेस नेते संजय निरुपम मात्र एकत्र सभा होईल, त्याचं नियोजन सुरू असल्याचे सांगत आहेत. पण नेमकी कुठे आणि कधी हे त्यांनाही माहीत नाही. एकूणच काय, तर पवार-गांधींच्या संयुक्त सभेचा पत्ता तर नाहीच आहे. शिवाय त्यांच्या स्थानिक नेत्यांमध्येही याबाबत एकवाक्यता नाही, असंच दिसत आहे. एकीकडे ऐनवेळी युती होऊनही शिवसेना-भाजपचे नेते एकदिलाने कामाला लागलेत. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस अनेकदा एकत्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही ठाकरेंच्या हातात हात घालून मतदारांना साद घालत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये आलबेल असल्याचे दिसून येत आहे.