अरे बापरे, वाघ खरंच एवढा घातक प्राणी आहे?

अवनी वाघीणीला ठार मारल्यानंतर, राज्याच्या वन विभागावर टीका होत आहे. अवनीला ठार का मारलं? यावर दोन गट पडले आहेत.

Updated: Nov 9, 2018, 07:28 PM IST

मुंबई : अवनी वाघीणीला ठार मारल्यानंतर, राज्याच्या वन विभागावर टीका होत आहे. अवनीला ठार का मारलं? यावर दोन गट पडले आहेत. अवनी वाघीणीने काही लोकांना ठार मारल्याचा आरोप आहे. यानंतर अवनीला ठार मारण्यात आलं, पण अवनीनंतर तिचे दोन बछड्यांची यांची आई गेली, याविषयी काही जणांनी आपली चिंता सोशल मीडियावर जाहीर केली आहे. (बातमीच्या शेवटी पाहा वाघीणीची माणसाशी मैत्री)

एकंदरीत खरोखर वाघ हा प्राणी मानवासाठी घातक आहे का? वाघ आणि माणसात कधीच मैत्री होवू शकत नाही का? यावर सध्या सर्वांच्याच मनात नाही, असेच विचार घर करत असतील. 

पण बीस्ट बडीज या फेसबूक पेजवर आलेला व्हिडीओ पुन्हा तुम्हाला वाघाणीच्या जवळ घेऊन जात आहे. वाघ आणि माणसाची मैत्री होवू शकते, असंच इंडोनेशियातील या माणसाच्या आणि वाघीणीच्या मैत्रीवरून दिसून येत आहे.

वाघीणीला खावू खालण्यापासून सर्वच काम पाहिलं जातं, एकदा वाघीणीने डोळ्याच्या खाली देखील मला चावलं होतं, असं या व्हिडीओत सांगितलं आहे. तसं करण्याचं तिच्या मनात काही नव्हतं असंही या व्हिडीओत म्हटलं आहे.

पाहा, वाघाची आणि माणसाची मैत्री