आज 'सीएसएमटी'तून १२.५ ची शेवटची लोकल

काही एक्सप्रेसच्या वेळेत आणि थांब्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

Updated: May 11, 2019, 07:16 PM IST
आज 'सीएसएमटी'तून १२.५ ची शेवटची लोकल title=

मुंबई : मध्य रेल्वेकडून आज रात्रीपासूनच मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कुर्ला ते सायन स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकांतून अंबरनाथसाठी शेवटची लोकल असेल. कुर्ला ते सायन दरम्यान सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांपासून मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकसाठी लांब पल्ल्याच्या सिंहगड, भुसावळ, इंद्रायणी आणि इतर काही एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्या आहेत. 

सीएसएमटीतून १२.५ ची अंबरनाथ शेवटची लोकल असून कुर्ल्याहून १२.१५ ची कसारा तर १२.२५ ची कर्जत लोकल आहे. त्यानंतर रविवारी सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी आसनगावसाठी पहिली लोकल निघणार आहे. आज रात्री भुसावळ ते सीएसएमटी पॅसेंजर आणि पुणे ते सीएसएमटी मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच काही एक्सप्रेसच्या वेळेत आणि थांब्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत.