close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विरारमध्ये मायलेकाची आत्महत्या, परिसरात हळहळ

आर्थिक चणचण असल्यानं आत्महत्या केल्य़ाची प्राथमिक माहिती आहे. 

Updated: May 11, 2019, 04:23 PM IST
विरारमध्ये मायलेकाची आत्महत्या, परिसरात हळहळ

मुंबई : मुंबईतल्या विरारमध्ये मायलेकानं आत्महत्या केली. आर्थिक चणचण असल्यानं आत्महत्या केल्य़ाची प्राथमिक माहिती आहे. नारंगीमधल्या साई हेरिटेमध्ये ही घटना घडली आहे. २५ वर्षीय विनय प्रकाश चौगुले आणि त्याची ४२ वर्षीय आई सरस्वती भाड्यानं राहत होता. दोघांनीही विष पिऊन आत्महत्या केली आहे.

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमाराला आत्महत्येची बाब उघड झाली. विनय चांगला क्रिकेटर असल्यानं त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.