मुंबई : मुंबईत पावसाने दांडी मारली असताना थंड आणि गारगार वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी वॉटर किंगडममध्ये हजेरी लावली आहे. वॉटर किंगडममधल्या स्लाईडस आणि वेव पुलसह इतर मनोरंजनांच्या साधनांचा पर्यटक मनसोक्त आनंद लुटतायत. त्यामुळे पर्यटकांचा विकेंड वॉटर किंगडमच्या कुल वातावरणात पार पडतोय.
वॉटर किंग्डम पर्यटकांसाठी सीझनप्रमाणे थीम आणत असतो. आताही रेनी सीझनसाठी “अब पानी उपर से भी” ही मोहीम राबवण्यात आली. या मोहीमेचा पर्यटक मनसोक्त आनंद घेतायत. तसेच वॉटर किंगडममध्ये ‘गो क्रेझी’ या मोहिमेच देखील आयोजन करण्यात आले आहे. या मोहीमेत क्रेझी होत पर्यटकांनी पुलमधील थंड वातावरणाचा आनंद लुटला.
वॉटर किंगडममध्ये पर्यटक मित्रांच्या ग्रुपसह आणि कुटूंबासह पर्यटनाचा आनंद लुटतायत. प्रत्येक वयोगटासाठी येथे सर्व मनोरंजनाची साधने असल्याने असंख्य पर्यटकांनी आपल्या कुटूंबासोबत वॉटर किंग्डमला हजेरी लावली होती.वॉटर किंगडममध्ये पर्यटक विकेंडचा पुरेपुर आनंद घेताना दिसत आहेत. वेव पूल, स्लाईडस, राईडस,लहान मुलांसाठी असलेले राईडस अशा सर्व राईडस लहानांपासून मोठ्यापर्यत सर्वच पर्यटक आनंद घेतायत.
तुम्ही जर अजूनही वॉटर किंगडमचा आनंद घेतला नसेत तर आताच https://www.waterkingdom.in/travel/ या वेबसाईटवर तुम्ही तिकीट बुकिंग करू शकता. तुमच्या कॉलेज आयडीवर, तुमचे मित्र आणि कुटुंबीय यांच्यासाठी वॉटर किंगडमचे तिकिट बुक करून तुम्ही पर्यटनाचा आनंद लुटु शकता. त्यामुळे लगेच तिकीट बुकिंग करा आणि वॉटर किंगडममध्ये आनंद घ्यायला तयार राहा.