Mumbai Trans Harbour Link : मुंबईतील बहुप्रतिक्षित MTHL इन्फ्रा प्रकल्प अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं काम 85 % काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 2023 पासून या मार्गावर वाहने धावताना दिसतील. मुंबई ते उरण हे अंतर फक्त 20 मिनिटात पार करता येणार आहे. जवळपास 17 हजार कोटींचा हा प्रकल्प आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 7.8 कि.मी.च्या मार्गासाठी जवळपास 60 हजार टन स्टील आणि 3.75 लाख क्युबिक मीटर क्राँक्रिट वापरण्यात आला आहे. मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक हा असा मार्ग आहे जो मुंबईला थेट नवी मुंबई, उलवे, न्हावाशेवा आणि जेएनपीटी या शहरांशी जोडेल. हा प्रवास करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात, मात्र या मार्गामुळे हा प्रवास 20 मिनिटात होणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवास देखील आणखी वेगवान होणार आहे. मुंबईतून शिवडी-न्हावाशेवा सी लिंकवरून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचता येणार आहे. यासाठी मुंबई-पोरबंदर प्रकल्प म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सी लिंक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा MMRDA चा प्लान आहे. हजारो प्रवाशांना याचा फायदा होणार असून वेळही वाचणार आहे.