राज्य सरकारच्यावतीने बदल्यांच्या स्थगितीमुळे नोकरवर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी?

 राज्यसरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 30 जून पर्यत बद्दल्या करण्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी व आधिकरी यांनी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

Updated: Jun 1, 2022, 03:58 PM IST
राज्य सरकारच्यावतीने बदल्यांच्या स्थगितीमुळे नोकरवर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी? title=

मुंबई : राज्यसरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 30 जून पर्यत बद्दल्या करण्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी व आधिकरी यांनी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ही स्थगिती मागे घेण्यात यावी यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून निर्णय मागे घेण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे

बदल्याना स्थगिती देणे अधिनियम, २००५ नुसार बदल्यांबाबतची कार्यवाही दरवर्षी ३१ मेपर्यंत होणे अभिप्रेत आहे. मात्र, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या बदल्या दि. ३० जून, २०२२ पर्यंत करु नयेत, असा जीआर  २७ मे, २०२२ अन्वये सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचे नियम लक्षात घेता, शासनाचा हा निर्णय अनाकलनीय आहे. 

वास्तविक, बदल्या व त्याबाबतची कार्यवाही वेळेवर झाल्यास, नवीन ठिकाणी निवासव्यवस्था व प्रामुख्याने पाल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था वेळेत करणे, अधिकाऱ्यांना शक्य होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन वर्षात नियमित बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे जे अधिकारी बदलीस पात्र आहेत, त्यांच्यावर हा मोठा अन्याय आहे. असे राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दी. कुलथे यांनी व्यक्त केली आहे